गडचिरोलीतला जहाल माओवादी आयतू पोलिसांना शरण

December 29, 2015 5:16 PM0 commentsViews:

Gadchiroli231

29 डिसेंबर : 52 पोलिसांच्या हत्येचा मास्टरमाईंड आणि जहाल माओवादी आयतु उर्फ अशोर गजरालाने तेलंगाणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यामुळे तेलंगणा आणि गडचिरोली जिल्हय़ातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

वारंगलचे डीआयजी मलारेड्डी यांच्यासमोर आयतुने आत्मसमर्पण केलं. आयतुच्या आत्मसमर्पणाने अनेक गुन्ह्यांचा उडगडा होण्याची शक्यता आहे. तसंच माओवादी चळवळीच्या कारवायांना आळा बसण्यास मदत होणार आहे. आयतु हा गडचिरोली इथल्या माओवादी चळवळीचा मुख्य सूत्रधार आहे. 2009मध्ये घडलेल्या पोलीस हत्याकांडाचाही तो मास्टरमाईंड आहे. यावेळी माओवाद्यांनी एकुण 52 पोलिसांच्या हत्या केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close