इनक्युबेटरमध्ये अर्भकाचा जळून मृत्यू

February 22, 2010 9:45 AM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारीअर्भकाचा इनक्युबेटरमध्ये जळून मृत्यू झाल्याचा दुदैर्वी प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमधील प्रसुती विभागात ही घटना घडली.दुर्गा काळे नावाच्या महिलेचे हे मूल होते. नरखेड जवळच्या केडी गावच्या या महिलेने 17 तारखेला गेटवेल हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. पण मुलांचे वजन कमी असल्याने त्यांना इनक्युबेटरमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काळे कुटुंबीयांना या बाळांना 19 तारखेला या सरकारी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या दोनही मुलांना इनक्युबेटर मध्ये ठेवण्यात आले. पण वॉर्मर जास्त गरम झाल्याने यात एक बाळ दगावले. तर दुसरे गंभीर जखमी झाले आहे.हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप या बाळांच्या पालकांनी केला आहे. दरम्यान नागपूरच्या दौर्‍यावर असलेले आरोग्यमंत्री विजय कुमार गावीत यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.

close