दोन्ही ‘भाई’ जिंकले ; कदम, जगताप विधानपरिषदेवर

December 30, 2015 7:13 PM0 commentsViews:

 

30 डिसेंबर : मुंबईतल्या विधान परिषदेच्या 2 जागांवर शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनी विजय मिळवलाय. भाई जगताप केवळ 9 मतांनी विजयी झाले आहे. तर अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांचा पराभव झालाय. अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांचा 9 मतांनी पराभव झालाय. अपक्ष असूनही त्यांनी मारलेली मजल लक्षणीय आहे. प्रसाद लाड यांच्या पारड्यात 55 मतं पडली.

विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना असल्यामुळे रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जात होता. निकालअंती यावर शिक्कामोर्तब झालं. या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते प्रसाद लाड अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. त्यांनी चांगली झुंज देत 55 मतं मिळवली पण 9 जागांनी त्यांचा पराभव झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close