विधान परिषदेच्या विजयी उमेदवाराची यादी

December 30, 2015 11:05 AM0 commentsViews:

vidhan bhavan330 डिसेंबर : विधानपरिषदेवर कोण जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. 8 जागेसाठी मुंबई, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये 8 जागांसाठी मतदान घेण्यात आले. अखेरीस आज निकाल जाहीर झाला असून काँग्रेसने आघाडी घेतलीये. काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेने 2 उमेदवारी विजयी झाले. राष्ट्रवादीला 1 जागेवर समाधान मानावं लागलं. तर भाजपने 1 आणि पुरस्कृत उमेदवारसह अशा 2 जागा पटकावल्या आहे.

विजयी उमेदवाराची यादी

मुंबई – काँग्रेस -भाई जगताप
शिवसेना – रामदास कदम
मुंबईत – राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले प्रसाद लाड पराभूत झाले.

धुळे – काँग्रेस – अमरीश पटेल

अहमदनगर – राष्ट्रवादी – अरूण जगताप

कोल्हापूर – काँग्रेस – सतेज पाटील

नागपूर – भाजप – गिरीश व्यास

अकोला-बुलडाणा-वाशिम – शिवसेना – गोपिकिशन बजोरिया

सोलापूर – भाजप पुरस्कृत – प्रशांत परिचारक

8 जागेपैकी – काँग्रेस – 3, राष्ट्रवादी – 1, शिवसेना – 2, भाजप – 1, भाजप पुरस्कृत – 1

(सविस्तर बातमी लवकरच)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close