दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी कटिबद्ध

February 22, 2010 9:53 AM0 commentsViews: 5

22 फेब्रुवारीसंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. अभिभाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींनी पुणे बॉम्बस्फोटातल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली.आगामी काळातला युपीए सरकारच्या कामकाजाचा आराखडा राष्ट्रपतींनी मांडला. महिला आरक्षण विधेयक, अन्नसुरक्षा, दहशतवाद, नक्षलवाद्यांशी चर्चा आणि शेजारी देशांशी संबंध या सर्व मुद्द्यांना राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात स्पर्श केला. रस्ते, झोपडपट्टी विकास खेड्यापाड्यात वीज आणि दळणवळणाच्या सोयी पोचवणं, शिक्षणाच्या विकासावर भर ही युपीए सररकारची धोरणे राष्ट्रपतींनी स्पष्ट केली.अभिभाषणातील मुद्दे- – नक्षलवाद्यांशी चर्चा करायला सरकार तयार- दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी प्रशासकीय व्यवस्था सक्षम करणार- वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अन्नसुरक्षा विधेयक सादर करणार- महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी सरकार कटिबद्ध

close