मुलगी झाली म्हणून प्राध्यापक पतीकडून पत्नीला दगडाने मारहाण

December 30, 2015 8:12 AM2 commentsViews:

pune woman marhan30 डिसेंबर : मुलगी झाली म्हणून विवाहितेला सासरच्या मंडळींनी दगडाने ठेचत मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यात फरासखाना परिसरात राहणार्‍या प्रज्वल ओहवाळ या विवाहितेला मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी आणि पती रमेश ओहवाळने अमानुषपणे मारहाण केली. विशेष म्हणजे रमेश ओहवाळ हा पुणे विद्यापीठात प्राध्यापक आहे. दगडाने ठेचत दहा व्यक्तींनी तिला मारहाण केलीय. मुलगी झाली म्हणून गेल्या दोन वर्षांपासून तिला मारहाण केली जातेय. मुलींना जन्म द्या त्यांना वाढवा अस सरकार म्हणत पण माझ्या मुलीचा जन्म झाल्यापासून सासरच्या मंडळींनी अतोनात मारहाण केल्याच प्रज्वल ओहवाळ या विवाहितीने आपली व्यथा मांडली. अखेर या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये याविषयीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinit Gavankar

    Hand till death to such father / husband .

  • Vinit Gavankar

    Tya 10 janana taka jail madhe

close