राज ठाकरेंना जामीन

February 22, 2010 10:30 AM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारीराज ठाकरे यांना चोपडा कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. साडे सात हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर झाला. ऑक्टोबर 2008 ला मनसेने परप्रांतियांच्या विरोधात राज्यभरात छेडलेल्या आंदोलनाचे पडसाद चोपड्यातही उमटले होते. मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव पुतळा जाळला होता. तसेच बसवर दगडफेकही केली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. राज ठाकरे यांच्या चिथावणीवरून स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. येथील मनसे कार्यकर्त्यांना यापूर्वीच कोर्टात हजर झाल्याने जामीन मिळाला आहे. यापूर्वीच्या काही तारखेला राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने कोर्टाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते.

close