दरोडेखोर समजून शेतकर्‍यावर गोळीबार

February 22, 2010 10:44 AM0 commentsViews:

22 फेब्रुवारीदरोडेखोर समजून शेतकर्‍यावरच गोळीबार झाल्याची घटना सोलापुरात उघडकीस आली आहे.हा गोळीबार बीएसएफच्या जवानाने केल्याचेही उघड झाले आहे. गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍याचे नाव चंद्रशा सावकार असे आहे. तर परमेश्वर पाथ्रे असे बीएसएफच्या जवानाचे नाव आहे. तो सध्या जम्मू सीमेवर तैनात आहे. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार शनिवारी अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात घडला.

close