विरोधकाचा पुतळा जाळताना ‘त्यांची’ लुंगी जळाली

December 30, 2015 8:08 PM0 commentsViews:

chennai-lungi-protest3-580x395

30 डिसेंबर : तामिळनाडूत करुणानिधींचा द्रमुक आणि जयललितांचा अण्णाद्रमुक या पक्षांतील वैर सर्वश्रुत आहे. याच विरोधातून बुधवारी प्रतिस्पर्धी नेत्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना आंदोलकांची लुंगी जळाल्याचा विचित्र प्रकार घडला.

काही दिवसांपूर्वी द्रमुकचे नेते विजयकांत यांनी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री जयललिता यांच्या पोस्टरविरोधात वक्तव्य केल्यावरून तामिळनाडुतील राजकीय वातावरण तापले होते. याच पार्श्वभूमीवर आज अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी विल्लूपुरममध्ये जयललिता यांच्या कार्यकर्त्यांनी विजयकांत यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत होते.

यावेळी अचानकपणे आग भडकली आणि सभोवती उभ्या असलेल्या आंदोलकांच्या लुंग्यांनी पेट घेतला. लुग्यांनी पेट घेतल्यानंतर हे कार्यकर्ते सैरावरा धावत सुटले. थोड्याचवेळात ही आग विझवण्यात आली. मात्र, यादरम्यान कार्यकर्त्यांचे पाय चांगलेच होरपळून निघाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close