राज ठाकरेंची गडकरींवर टीका

February 22, 2010 11:55 AM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारीअयोध्येतील राम मंदिरासाठी सहकार्य करा, या मंदिराच्या शेजारीच मशीद बांधण्यासाठी आम्ही सहकार्य करू, असे आवाहन नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी इंदूरमध्ये केले होते. त्यांच्या या भूमिकेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजपची जर हीच भूमिका होती तर मग इतका हंगामा का केला? असे अगोदरच सांगितले असते तर, मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगली, बॉम्बस्फोट टळले असते, असा टोलाही त्यांनी मारला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथे ते पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेत मराठी भाषा दिनानिमित्त मनसेची भूमिका, बेराजगांरासाठी मनसेचे धोरण, ठेवीदारांचे प्रश्न आदी विषयांवरची मनसेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. कोर्टात हजर राहण्यासाठी चोपडा इथे आले असताना राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

close