विद्या बालनला किडनी स्टोनचा त्रास, हिंदुजा हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

December 31, 2015 8:56 AM0 commentsViews:

viday balan31 डिसेंबर : अभिनेत्री विद्या बालनला किडनी स्टोनचा त्रास जाणवल्यामुळे बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय.

विद्या न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत परदेशात निघाली होती. त्यासाठी अबुधाबी येथून विमान बदलून ती दुसर्‍या विमानात बसली. मात्र, अचानक तिच्या पाठीत फार दुखायला लागलं. या वेदना एवढ्या वाढल्या की विमानातील कर्मचार्‍यांना विमान थांबवून तीला आणि सिद्धार्थ यांना खाली उतरवावं लागलं. त्यानंतर सिद्धार्थ यांनी लगेचच तिला प्राथमिक उपचार देऊन पुढच्याच विमानाने मुंबईला आणून हिंदुजा रूग्णालयात दाखल केलं. प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी किडणी स्टोनमुळे तिला हा त्रास झाल्याचं निदान झालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close