महेश मोतेवारची तब्येत बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

December 31, 2015 9:04 AM0 commentsViews:

Mahesh-Kisan-Motewar31 डिसेंबर : उस्मानाबादमधील मुरूग येथील डेअरी घोटाळ्यातील मुख्य आरोपी महेश मोतेवारची तब्येत बिघडलीय. उस्मानाबाद रुग्णालयातून सोलापूरला हलवण्यात आलंय. छातीत आणि पाठ दुखीचा त्रास होत असल्याने सोलापूरला हलवण्यात आलं.

महेश मोतेवारला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. मुरूगमधील शेतकर्‍यांना डेअरी काढून देण्याच्या आमिषाखाली 35 लाख रूपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून त्याला दोन दिवसांपूर्वी पुण्यातून अटक करण्यात आली होती. त्यानुसार उमरगा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाईल. काल रात्री महेश मोतेवारला आजारपणाच्या तपासणीसाठी रुग्णालयात नेलं होतं. पण डॉक्टरांनी नियमित तपासणी करून लगेच सोडून दिलं. पण, पुन्हा छातीत आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close