ड्रग्जला रणबीर, दीपिका,बाजीराव मस्तानीची नावं

December 31, 2015 9:34 AM0 commentsViews:

drugs31 डिसेंबर : थर्डी फर्स्टच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने ठिकठिकाणी पाटर्‌यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या पाटर्‌यांमध्ये पार्टी ड्रग्जच्या नावाखाली चरस गांजासह कोकेने,हेरॉईन एमडी आदी ड्रग्ज पुरवले जातात. अशा ड्रग्जचा व्यापार करतांना सांकेतिक शब्द देण्यात येतात.

यावर्षी ड्रग्जसाठी बाजीराव मस्तानीसह अन्य चित्रपटांची नावे आणि रणबीर, दीपिका, कतरीना, शाहरुख यांच्या नावांचा सांकेतिक शब्द म्हणून वापर करण्यात येतो आहे. अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीसाठी सोशल मीडियाचाही वापर वाढला आहे. त्यामुळे क्राईम ब्रँचची सोशल मीडिया लॅब फेसबूक, ट्विटर सोबत डार्कनेटवर लक्ष ठेवून आहे.

ड्रग्ज विरोधी कारवाई – वर्ष 2015

एकूण केसेस- 17 हजार 268
अटक केलेले आरोपी- 18 हजार 659
जप्त ड्रग्जचं मुल्य- 12 कोटी 50
सर्वाधिक जप्त ड्रग्ज- गांजा (408 किलो)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close