वीज कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

February 22, 2010 12:14 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारीराज्यातील वीज कर्मचार्‍यांनी आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. महानिर्मिती कंपनीच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या वीज वितरण आणि 27 जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरण आणि फ्रँचाईझीकरण करण्याचा घाट ऊर्जा खात्याने घातल्याचा, वीज कर्मचारी संघटनेचा आरोप आहे. त्याविरोधात वीज कर्मचारी आणि अभियंते संपावर जाणार आहेत. वीज निर्मितीचा सध्याचा खर्च युनिटमागे 23 ते 40 पैसे आहे. हे प्रकल्प खाजगी कंपन्यांच्या हातात गेले तर हीच किंमत 3 रु. 80 पैसे एवढी होईल. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर पडेल अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. याचसंदर्भात आज दुपारी, वीज कर्मचारी संघटनांसोबत महवितरणच्या मॅनेजमेंटची बैठक झाली. पण ही बैठक फिस्कटली. वीजपुरवठ्यावर या संपाचा परिणाम होणार नसल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

close