उंदिरमामांमुळे लंडनला जाणारे विमान माघारी परतले

December 31, 2015 12:17 PM0 commentsViews:

rat in air india31 डिसेंबर : घर असो की ऑफिस नको ते कुरतडून धुडगूस घालणारे उंदिरमामा अचानक एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात अवतरल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे मुंबईहून लंडनला जाणार्‍या विमानाचं उड्डाणानंतर काही मिनिटांतच पुन्हा मुंबई विमानतळावर उतरविण्यात आलंय.

एअर इंडियाचं-131 हे विमान मुंबईहून लंडनला जायला निघालं होतं. त्यावेळी एका प्रवाशाला विमानात उंदीर दिसला त्याने लगेचच विमान कर्मचार्‍याकडे तक्रार केली. त्यानंतर इमरजन्सी लँडिग करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण एका उंदिरामुळे पर्यायी विमान व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांना वाट बघावी लागली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close