पालघरमध्ये ‘ड्रोन’च्या मदतीने दारूचे अड्डे केले उद्‌ध्वस्त

December 31, 2015 1:02 PM0 commentsViews:

palghar news31 डिसेंबर : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी गावठी दारू शोध मोहीम हाती घेतली आहे. यासाठी त्यांनी ड्रोन कॅमेरा चा वापर केला आहे. वसईतील मलाजीपाडा हा विभाग गावठी दारूसाठी ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात या परिसरात गावठी दारू बनवली जाते.

मालवणीतील गावठी दारू प्रकरणात याच विभागातून दारू पुरवठा झाल्याची माहिती मिळाली होती. वसईतील मलाजीपाडा विभागात भाईंदर खाडी इथे तीन बेटं आहेत. या बेटांवर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवली जाते. पोलिसांनी चार टीम तयार करून ड्रोन च्या साहाय्यानं पाहणी करून गावठी दारूच्या भट्‌ट्या फोडल्या ही कारवाई आणखी आठ दिवस अशीच चालू राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close