दारू नको, दूध प्या !

December 31, 2015 1:45 PM0 commentsViews:

31 डिसेंबर – थर्टी फस्टची रात्र आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्लनिग करतात. काही तळीराम दारू, मटन, चिकन, मासे खाण्याचं प्लनिग करतात. मात्र अशा व्यसनाच्या आहारी जाऊन तरुण पिढी त्यांचं आयुष्य उद्‌ध्वस्त करतेय. अशांना या व्यसनापासून दूर करण्यासाठी भुसावळच्या पिपल्स रिपब्लिक पार्टीतर्फे अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी दारू नको, दूध प्या असा संदेश देण्यात आलाय. गेल्या 5 वर्षांपासून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि तरुणांना सामाजिक संदेश देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येकाने नवीन वर्षाचे स्वागत आपल्या परिवारासह साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. तसंच नवीन वर्षा निमित्त संकल्प करून आपले भविष्य उज्ज्वल केले पाहिजे असं पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close