‘दारूचा पाश, कुटुंबाचा नाश’

December 31, 2015 1:50 PM0 commentsViews:

31 डिसेंबर :  अवघी तरुणाई 31 डिसेंबरच्या पार्टीच्या तयारीमध्ये गुंतली असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड इथल्या हलकर्णीच्या चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेगळा उपक्रम राबवलाय. सुसाट गाडी चालवणाऱ्यांसाठी या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच घोषणा लिहिल्यात. बेळगाव वेंगूर्ला महामार्ग आणि या रस्त्यावर हे संदेश लिहिण्यात आलेत. काही तरूण थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या नादात स्त्यावरून अतिउत्साहात भरधाव गाडी चालवून अपघाताला कारणीभूत ठरतात. त्यामध्ये स्वत:च्या आणि इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होतो, याचं भान ते राखत नाही. हे भान त्यांनी ठेवावं यासाठी या विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close