‘स्फोटाविषयी आठवडाभरात ठोस माहिती मिळेल’

February 22, 2010 12:23 PM0 commentsViews:

22 फेब्रुवारीपुणे बाँबस्फोटप्रकरणी एटीसचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यासंदर्भात आठवडाभरात ठोस माहिती पुढे येईल, असा दावा केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी केला आहे. तसेच स्फोटाचा तपास एनआयएकडे जाणार नाही याचा पुनरूच्चारही त्यांनी केला आहे. पुणे बॉम्बस्फोटाला आठवडा उलटून गेलाय. पण या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सीमीच्या काही कार्यकर्त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण स्फोटाप्रकरणी अजून कोणताही ठोस उलगडा झालेला नाही.

close