मोदी सरकारने वर्षभरात जाहिरातींसाठी खर्च केले 850 कोटी !

December 31, 2015 3:33 PM0 commentsViews:

modi sarkar add31 डिसेंबर : ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘अब की बार मोदी सरकार’ अशी जाहिरातबाजी करत मोदी सरकार सत्तेवर विराजमान झालं. पण, जाहिरातबाजी धडाका याही वर्षी सुरूच होता. गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जाहिरातींवर तब्बल 850 कोटी खर्च केलाय.

मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात जाहिरातींवर 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केल्याचं सुचना आणि प्रसारण खात्याने माहितीच्या अधिकारात सांगितलं आहे. या सर्व जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या जाहिराती सर्वाधिक असल्याचंही या माहितीत पुढे आलंय. पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते प्रणय अजमेरा यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नात ही माहिती देण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close