तळीरामांना गाडी देऊ नका आणि सोबत प्रवासही करू नका अन्यथा..!

December 31, 2015 4:12 PM0 commentsViews:

drink and drive cjhecking

31 डिसेंबर : मित्रप्रेमा पोटी जर तुम्ही, दारू प्यायलेल्या मित्राला गाडी चालवू दिली तर आता तुमच्यावरही कारवाई होणार आहे. एवढंच नाहीतर दारू पिऊन गाडी चालवणार्‍यासोबतच्या सहप्रवाशांवरही ठाणे पोलीस कारवाई करणार आहेत. सहप्रवासीने जरी दारू पिलेला नसेल तरीही, तरीही त्याला गाडी चालवायला तुम्ही परवानगी दिली. त्याची साथ दिली, त्यामुळे सहप्रवासीही दोषी ठरणार आहेत.

2015 चा आजचा शेवटचा दिवस. नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी तरूणाई 31 डिसेंबरच्या पार्टीच्या तयारीमध्ये गुंतली असताना, तळीरामांवर आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी ही नवी शक्कल लढवली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री ड्रंक अँड ड्राइव्ह, रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त असतोच. पण तरीही ड्रंक अँड ड्राइव्हमुळे अपघात होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. त्यासाठी ठाणे पोलिसांनी बार मालकांचीही बैठक घेतलीये.

त्यामुळे आता तळीरामा मित्रासाठी नाही, तर स्वत:ला वाचवण्यासाठी दारू पिलेल्या मित्राला गाडी चालवू देऊ नका. नाहीतर पोलिसांच्या कारवाईला तुम्हालाही सामोरं जावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close