गुडबाय 2015… वेलकम 2016!

December 31, 2015 10:12 PM0 commentsViews:

3000

31 डिसेंबर : 2015 साल मागे टाकत आपण एका नवीन वर्षात उत्साहाने, आत्मविश्वासाने आणि उमेदीने प्रवेश करणार आहोत. जुनं सगळं इतिहासजमा होऊन नव्या वर्षाचं आपण जल्लोषात स्वगत करत आहोत. सगळ्या जगात सेलिब्रशेनचा मूड आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सगळ्यात आधी नव्या वर्षांचं आगमन झालं आहे. या दोन्ही देशात नयनरम्य आतषबाजीने 2016 सालाचं स्वागत झालं.

न्यूझीलंडमधला स्काय टॉवर या आकषबाजीने झळाळला. मुंबईतही आता नवीन वर्षांच्या स्वागताला सगळे उत्सुक झालेत.मरीन ड्राईव्हवर हळूहळू लोक जमा होत आहेत. गाणी गात आहेत. रात्री बाराच्या ठोक्याला मरीन ड्राईव्हवर आतषबाजी होईल. गोव्यातही असाच मूड आहे, पार्टी फीव्हर सगळीकडे पसरलाय. गोव्यात बागा बीचवर पर्यटकांची गर्दी आहे. सगळेजण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करायला आतूर झालेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close