दुबईत हॉटेलला भीषण आग

January 1, 2016 8:19 AM0 commentsViews:

WireAP_4bf4195c43c141189d9ed2360a715ecc_16x9_1600

1 जानेवारी : सर्वत्र नववर्षाचा जल्लोष सुरू असताना दुबईतील द ऍड्रेस डाऊनटाऊन या हॉटेलला भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की हे हॉटेल पूर्णपणे आगीच्या ज्वाळांनी वेढलं आहे. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या जवळच हे हॉटेल आहे.

63 मजल्यांच्या या इमारतीचे कमीत कमी 20 मजले आगीत भस्मसात झाले असून आगीचे कारण समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत कुणीही जखमी किंवा मृत झाल्याची माहिती हाती आलेली नाही. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न पहाटेपर्यंत सुरूच होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close