धरणग्रस्तांची पुण्यात संघर्षयात्रा

February 22, 2010 2:10 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारीपुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यातील धरणग्रस्तांनी आज संघर्षयात्रा काढली. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा ते पुणे अशी ही पदयात्रा काढण्यात आली. टाटा कंपनीच्या भुशी, सिरवता, सोमवाडी, ठोकळवाडी, मुळशी या धरणांच्या विरोधात गावकर्‍यांनी ही यात्रा काढली.टाटा कंपनीच्या ताब्यात असलेली जादा जमीन सरकारने परत घेऊन धरणग्रस्तांना द्यावी, अशी या धरणग्रस्तांची मुख्य मागणी आहे. गेली 100 वर्षं टाटा कंपनी या धरणांचा वीजनिर्मिती साठी वापर करत आहे. त्यामुळे धरणग्रस्तांच्या वारसांना 100 वर्षांची भरपाई द्यावी, विस्थापित गावांचे पुनर्वसन करावे, धरणग्रस्तांच्या मुला-मुलींना टाटा कंपनीमध्ये नोकर्‍या द्याव्यात, धरणग्रस्त कोळी बांधवांना जलाशयात मासेमारीला परवानगी द्यावी, अशा इतरही मागण्या या धरणग्रस्तांनी केल्या आहेत.

close