दिघावासीयांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

January 1, 2016 1:06 PM0 commentsViews:

digha_ncp
01 जानेवारी : दिघा अनधिकृत इमारती प्रकरणी हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. 9 इमारती खाली करण्याच्या कारवाईला हायकोर्टाने 7 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे.

प्रशासन याठिकाणी आजपासून कारवाईस सुरूवात करणार होतं. कोर्टाचा हा आदेश केवळ 9 इमारतीसाठी लागू आहे. उर्वरीत 81 इमारतीवर मात्र केव्हाही हातोडा पडू शकतो. प्रशासनाच्या कारवाईमुळे तब्बल 1500 पीडीत कुटुंबांवर नववर्षाच्या तोंडावरच बेघर होण्याची वेळ येवून ठेपलेली आहे.

अनधिकृत इमारती : पुढे काय?

– आज 9 इमारती खाली करणार
– कोर्टाच्या देखरेखीखाली या इमारतींचा ताबा MIDCला जाणार
– 90 पैकी ज्या इमारती कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात आहेत, त्यावर सध्या कारवाई नाही
– 81 इमारतींवर कधीही हातोडा पडण्याची शक्यता
– विधान परिषदेच्या उपसभापतींनी आदेश देऊनही राज्य शासनानं रहिवाशांची बाजू मांडली नाही
– हातोडा चालल्यास 1500 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close