दिल्लीत आजपासून ऑड-ईवन नियम लागू

January 1, 2016 12:32 PM0 commentsViews:

delhi odd even car

01 जानेवारी : दिल्लीत आजपासून ऑड-ईवन (सम-विषम क्रमांकाच्या कार) योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. 1 जानेवारी म्हणजे आज केवळ 1, 3, 5, 7 आणि 9 क्रमांकाच्या गाडय़ाच रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. तर उद्या म्हणजेच सम तारखेला 2, 4, 6 आणि 8 या क्रमांकांच्या धावणार. हा फॉर्मूला व्यवस्थितपणे पार पाडावा यासाठी आपचे सर्व कार्यकर्ते आणि वॉलंटियर्स शर्तिने प्रयत्न करत आहेत.

राजधानी दिल्ली प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना आखली आहे. या नियमांचा पालन न करणार्‍यांना 2 हजार दंड भरावा लागणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा नियम लागू राहणार आहे. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अतिरिक्त 6 हजार बसेस सोडण्यात आले आहेत. तसंच मेट्रोच्या फेर्‍यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

सध्या ही योजना 15 दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर असून, दिल्लीकरांच्या मिळणार्‍या प्रतिसादांवरून पुढील निर्णय घेतले जाणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close