संसदेच्या कॅन्टीनचे जेवण आज पासून महाग

January 1, 2016 2:03 PM0 commentsViews:

parliament of india general

01 जानेवारी : संसदेच्या  कॅन्टीनमध्ये खासदारांना स्वस्त दरात मिळणारा जेवण आजपासून महाग करण्यात आलं आहे. त्यामुळे खासदारांच्या खिशाला चाप बसणार आहे. खासदारांना मिळणारा स्वस्त दरातला भोजन यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

संसदेच्या  कॅन्टीनमध्ये स्वस्त दरात अन्न मिळावा यासाठी 16 कोटी रूपयांची सब्सिडी दिली जात होती. ही सब्सिडी शुक्रवारपासून बंद करून नो प्रॉफिट, नो लॉस या आधारावर  कॅन्टीन चालविण्यात येणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढाकार घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

नव्या निर्णयामुळे शाकाहारी थाली 18 रूपयांवरुन 30 रूपये करण्यात आली आहे. तर, 33 रूपयांत मिळणारी मांसाहारी थाली 60 रूपयाला मिळणार. थ्री-कोर्स मील 61 रूपयांवरून 90 रूपये करण्यात आली आहे. 29 रूपयाला मिळणारी चिकन करी आता 40 रूपयाला मिळणार आहे.  कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांच्या किंमतीत तब्बल सह वर्षांनंतर बदल होत असून यापुढे वेळोवेळी किमतीचे वेळोवेळी परिक्षण केले जाणार असल्याचं लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close