भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी लोटला भीमसागर

January 1, 2016 5:01 PM0 commentsViews:

01 जानेवारी : महार सैनिकांनी सुमारे 200 वर्षां पूर्वी गाजवलेल्या शौर्याला सलामी देण्यासाठी आज भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाला सलमी देण्यासाठी भीमसागर उसळला आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या शौर्याल्या सलाम करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झाले आहेत.bhima koregaon

आज 1 जानेवारी नव वर्षाचा पहिला दिवस…आजच्या दिवशी पुण्याजवळील कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखो भीम सैनिक येत असतात. या विजयस्तंभाला एक ऐतिहासिक महत्त्वही आहे.

1818 साली म्हणजेच सुमारे 200 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ब्रिटीश सैन्यातल्या महार रेजिमेंटनं सामजिक विषमता निर्माण करणार्‍या पेशव्यांचा पाडाव केला होता. भिमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 या दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली महार बटालियनच्या 500 सैनिकांनी 25,000 पेशवे सैन्याचा पराभव केला होता.

पेशव्यांबरोबर झालेल्या लढाईत महारांना यश मिळालं आणि तेव्हा क्षुद्र म्हणून हिणवल्या जाणार्‍या दलित अत्याचाराला आळा बसायला सुरुवात झाली होती. त्या लढाईत अनेक महार सैनिक शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे हा विजयस्तंभ उभारला गेला होता. त्याच विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी हे भीमसैनिक इथं जमले. या विजयस्तंभला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी लाखो भीम सैनिक येतात. आजही या ठिकाणी राज्यभरातील दलित एकवटले आहेत. त्यांच्याकडून या विजयस्तंभला सलामी दिली जाते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close