भुजबळांना क्लीन चीट देणार्‍या अभियंत्यांची चौकशी सुरू

January 1, 2016 7:50 PM0 commentsViews:

maha sadan01 जानेवारी : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना क्लीन चीट देणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर्स एस.डी. देबडवाड आणि टी.एस.चव्हाण यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसंच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

देबडवाड आणि टी एस चव्हाण यांनी इंजिनिअर्सनी अँटी करप्शन ब्युरोला पाठवलेल्या अहवालात भुजबळ यांना क्लीन चीट दिली होती. राज्य सरकारनं हा अहवाल फेटाळून लावला आहे. या अहवालात या दोन्ही इंजिनिअर्सनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कोणतीही अनियमीतता नसल्याचं म्हटलं होतं.

या अहवालाची अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना कल्पना नव्हती. या सगळ्या प्रकारामुळे सरकार करत असलेल्या चौकशीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ कुटुंबियांना कोणतीही क्लीन चीट दिली नसल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close