खासदारांनी झाकली मूठ…

February 22, 2010 3:29 PM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारीखासदारांनी त्यांची मालमत्ता जाहीर करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण कित्येक खासदारांनी आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही, असे आता उघड झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते राकेश वर्मा यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही बाब उघडकीला आणली आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर 90 दिवसांत संपत्तीचा तपशील जाहीर करायचा असतो. पण तब्बल 110 खासदारांनी या नियमाला हरताळ फासला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या खासदारांची संख्या जास्त आहे. तसेच यात माजी मंत्र्यांसोबतच यंग ब्रिगेडचाही समावेश आहे.मालमत्ता लपवणारी काही ठळक नावे पुढीलप्रमाणे- – माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा – माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव – पहिल्यांदाच खासदार झालेले मनिष तिवारी – फिल्मस्टार आणि काँग्रेसचे खासदार राज बब्बर – हरियाणाहून आलेले तरुण खासदार दीपेंद्र हुडा – भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे – भाजपचे खासदार नवज्योत सिंग सिद्धू – तरूण खासदार- जयंत चौधरी, कल्याणसिंग, असौद्दिन ओवासी, करिया मुंडा, श्रुती चौधरी, अर्जुन मुंडा, जगदंबिका पाल

close