पतीच्या प्रेतासोबत महिलेला अंघोळ घालण्याच्या प्रथेविरोधात ‘ती’चा एल्गार

January 1, 2016 8:33 PM1 commentViews:

kashipada_Samaj_jatpanchyat01 जानेवारी : पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात मान खाली घालायला लावणार्‍या अनेक घटना घडत आहे. त्याविरोधात आवाज उठवणार्‍यांचा आवाज अनेकदा दाबून टाकला जातोय. अशीच घटना घडलीये पुण्यात…अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांसमोर पतीच्या प्रेतासोबत डोक्यावर तूप लावून विधवेला अंघोळ, दहाव्या दिवशी तिचा साज उतरवणे, तिचा अशुभ चेहरा दिसू नये म्हणून अंधार्‍या खोलीत कोंडणे आदी अघोरी प्रकार म्हणजे वेगळ्या प्रकारची सतिप्रथाच. तेव्हा ती बंद करा, अशी विनंती केली जाते. जातीचे पंच ती धुडकावून लावतात. परिणामी, लेकीला वडिलांचे अंतिम दर्शन न करताच परत फिरावे लागले. पुण्यात गेल्या 24 डिसेंबरला हा प्रकार घडला. आता त्या लेकीने काशीकापडी समाजातील अशा प्रकारे होणार्‍या विधवांची अवहेलना विटंबनेविरुद्ध एल्गार पुकारला आहे.

कोमल वर्दे हिचे वडील शंकर मोतीराम वाटमकर (65) यांचं गेल्या गुरुवारी पुण्यात निधन झालं. पतीच्या निधनानंतर त्या महिलेला तूप
लावून प्रेतासोबत आंघोळ घातली जाते. इतकंच नाही तर तिला दहाव्या दिवशी तिला संपूर्ण अंधार्‍या खोलीत दिवसभर डांबून ठेवलं जातं. तिचं कोणीही तोंड पहायचं नाही अशा अनेक अघोरी गोष्टी केल्या जातात. याचविरोधात कोमलनं आवाज उठवला. हे थांबवण्यासाठी तिने पुढाकार घेतला. समाजातल्या लोकांना तिने तसं सुचवलं. तथापि, पंचांनी ती विनंती फेटाळली.

प्रथा बदलायच्या असतील तर महापंचायत बसवा, असं सांगितलं. विविध राज्यांमधील पंचांची मिळून बसणारी ही महापंचायत म्हणजे काही लाखांचा खर्च असल्याने ते शक्य नसल्याचे कोमल यांनी स्पष्ट केलं.

परिणामी, पुण्यातले पंच सुनील गादेकर, शंकर वाडेकर, शरद भिंगारे, नारायण आंदेकर, दीपक वाडेकर, दीपक वर्देकर, चंद्रकांत पालकर, भोलानाथ वाटमकर आणि महेंद्र वाटमकर या नऊ पंचांनी तिच्या आईला मुलगी हवी की पंच हवेत असा सवाल केला. याचाच दबाव येऊन आईनं पंच हवे म्हणून सांगितलं आणि कोमलला वडिलांचं अंत्यदर्शन न घेता परतावं लागलं. कोमलनं मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसंच फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

  • Bitter Truth

    अधोरी प्रथा ! पुण्यासारख्या सुधाररेल्या म्हणवणार्‍या शहरात आणि महाराष्ट्रासारख्या सुधाररेल्या म्हणवणार्‍या राज्यात झालेला हा प्रकार ऐकून एक मराठी माणूस म्हणूनच तर एक माणुस म्हणूनही शरम वाटली.

    कोणत्या अधोर्‍या इसविसनपूर्व शतकात राहत आहेत ही पंचमंडळी ??? :( सरकारने त्यांच्याविरुद्ध कडक कयदेशीर कारवाई करुन शिक्षा देणे जरूर आहे.

close