पाऊण कोटी मुंबईकर बजेटच्या प्रतिक्षेत

February 22, 2010 3:49 PM0 commentsViews: 4

22 फेब्रुवारीदेशभरात रेल्वेचे दीड कोटी रेल्वे प्रवासी आहेत. त्यापैकी तब्बल 75 लाख प्रवासी मुंबई महानगरीतील उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात.या पाऊण कोटी मुंबईकरांचे ममतादिदीच्या रेल्वे बजेटकडे लक्ष लागले आहे. एमयूटीपी म्हणजेच मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या तिसर्‍या फेजसाठी रेल्वे बजेटमध्ये किती तरतूद होणार हे सगळ्यात महत्वाचे आहे.प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये मुंबईवर अन्याय होतो. याचे मुख्य कारण आहे. मुंबईतील मौनी खासदार…ते बालत नसल्यानेच मुंबईच्या तोंडाला दरवेळी पाने पुसली जातात, असा प्रवासी संघटनांचा आरोप आहे.यावेळी रेल्वे प्रवासी संघाने मुंबईकरांच्या मागण्यांचा जाहीरनामा खासदारांकडे दिला आहे.प्रवाशांच्या ठळक मागण्या पुढीलप्रमाणे- पश्चिम रेल्वे- 12 डब्यांच्या गाड्या 15 डब्यांच्या करा- ग्रँट रोडवर पश्चिम रेल्वेचं टर्मिनस करा- चर्चगेट-विरार-डहाणू रेल्वे सुरु कराहार्बर लाईन– कसारा वाशी ट्रेन सुरु करा- 9 डब्यांच्या गाड्या 12 डबा करा- जलद गाड्यांची संख्या वाढवा- सीवूड्स उरण प्रकल्प पूर्ण करा- अंधेरी गोरेगाव लाईन टाका- वसई-विरार-दिवा-पनवेल ट्रेन सुरु करासेंट्रल रेल्वे- लेडीज स्पेशलच्या फेर्‍या वाढवा- कुर्ला-ठाणे 5,6 लाईन टाका- ठाणे-दिवा दरम्यान 5, 6 लाईन टाका

close