श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली सेन्सॉर बोर्डाची होणार पुनर्रचना

January 1, 2016 10:16 PM0 commentsViews:

shyam bengal01 जानेवारी : सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी नविन समिती नेमण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार या सेन्सॉरच्या पुनर्रचनेसाठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे.

बेनेगल यांच्या शिवाय दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, सिनेपत्रकार भावना सोमय्या, ऍड फिल्म दिग्दर्शक पियुष पांडे आणि नीना गुप्ता हे या समितीत सहसचिव पदावर असतील. माहिती आणि प्रसारण मंत्री अरूण जेटली यांच्या देखरेखीखाली ही समिती काम करेल. पुढील दोन महिन्यांमध्ये या समितीला नवीन तरतुदींचा मसुदा तयार करून केंद्र शासनाला सादर करायचा आहे. सेन्सॉरचे विद्यमान अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाची धुरा आपल्या हातात घेतल्यापासून बोर्डाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केलं जात होते.जेम्स बॉण्ड सिरिजच्या स्पेक्टर या सिनेमातील किसींग सीन परस्पर कट करण्याचा निर्णय घेतल्याने या कार्यपद्धतीवर जाहीर आक्षेप घेण्यात आले. सोशल मीडियावरूनही याबाबत टीकेची झोड उठली. त्यामुळेच अखेरीस केंद्राला यात हस्तक्षेप करून नव्या समितीची स्थापना करावी लागलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close