राहुल गांधी होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?

January 1, 2016 10:40 PM0 commentsViews:

rahul gandhiaw01 जानेवारी : लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसमधून राहुल गांधी अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली जात होते. अखेर आता लवकरच राहुल गांधी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष होणार अशी बातमी पीटीआयने दिलीये. काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधींच्या अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राहुल सध्या नववर्षाच्या सुट्टी निमित्त युरोपाच्या दौर्‍यावर आहे. युरोपातून परतल्यानंतर अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग येईल. गेल्या काही वर्षांपासून राहुलना अध्यक्ष करा अशी मागणी काँग्रेसजन करत होते. अलीकडे बिहार निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close