पठाणकोटमध्ये काय घडलं ?

January 2, 2016 1:53 PM0 commentsViews:

pathankot_Attack

02 जानेवारी : एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध सुधारले जावे यासाठी प्रयत्न केले जात आहे पण दुसरीकडे दहशतवादी यात आडकाठी आणत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवाद्यांनी पंजाबमधील पठाणकोट येथील सैन्याच्या विमानतळावर हल्ला केला. या हल्ल्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय. पण सैन्याचे 3 जवान या चकमकीत शहीद झाले आहे. नेमकं काय घडलं पठाणकोटमध्ये त्याबद्दलचा हा आढावा…

पठाणकोटवर कसा झाला हल्ला ?

- रात्री 1 वाजता
दहशतवाद्यांकडून पोलीस अधीक्षकांच्या गाडीचं अपहरण

- पहाटे 3 वाजता
पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर दहशवाद्यांचा हल्ला
लष्करी वेशातील दहशतवादी एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसले

- पहाटे 4 वाजता
दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांवर तुफान गोळीबार
लष्करी जवानांकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार
पहिल्या दोन तासांत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान,
चकमकीदरम्यान 2 जवानही शहीद
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबल नियंत्रण कक्षात दाखल

- सकाळी 8.30वाजता
एअरफोर्स स्टेशनमध्ये तब्बल 5 तास चकमक
चकमकीत एकूण 4 दहशतवादी ठार
दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद
पंजाबमध्ये हायअलर्ट जारी
2 हेलिकॉप्टरमधून हल्लाग्रस्त परिसराची पाहणी

- सकाळी 9.30वा
सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत तात्काळ बैठक
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर दिल्लीत दाखल
एनआयएची टीम पठाणकोटला दाखल
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एअरबेस परिसरात शोधमोहीम सुरू
हल्लेखोर दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याची शक्यता
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून हल्ल्याबाबत आढावा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close