दिघ्यातील धोकादायक नसलेल्या इमारती अधिकृत करण्याचे संकेत

January 2, 2016 3:15 PM0 commentsViews:

digha_ncp02 जानेवारी : दिघा परिसरातील अनाधिकृत इमारती प्रकरणात अखेर सरकारने हस्तक्षेप केला आहे. ज्या इमारती धोकादायक नाही त्यांना चारपट दंड लाऊन नियमित करणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे.

आयबीएन लोकमतने दिघ्यातील बेघर होणार्‍या कुंटुबांचा प्रश्न लावून धरला होता. ज्या इमारती धोकायदायक आहे, त्या पाडल्या जातील मात्र रहिवाशांचं पुर्नवसन केलं जाणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्र्यांनी सिडको आणि एमआयडीसीला सुचना दिल्यात. या संदर्भात विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनीही सरकारला हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले होते. दिघ्यातील 92 इमारतींवर महापालिकेनं हातोडा चालवलंय. या कारवाईच्या विरोधात दिघ्यातील रहिवाशांनी आंदोलन पुकारले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close