महागाईवरून संसदेत गोंधळ

February 23, 2010 10:00 AM0 commentsViews: 6

23 फेब्रुवारीसंसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आज सुरू झाल्यानंतर, विरोधकांनी महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.कलम 57 अंतर्गत महागाईच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधकांनी केली. स्थगन प्रस्ताव आणून सुरुवातीला महागाईच्या मुद्द्यावरच चर्चा व्हावी, इतर मुद्दे बाजूला ठेवावेत, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. पण सरकारने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी गदारोळ सुरू केला. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्या अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

close