मोदींची माफी मागा नाहीतर हातपाय तोडू, सबनीसांना धमकी

January 2, 2016 5:12 PM0 commentsViews:

sabanis_on_modi_sot302 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत शेलक्या भाषेत टीका करणारे साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींची माफी मागा नाहीतर हातपाय तोडून टाकू अशी धमकीच सबनीस यांना देण्यात आलीये. या प्रकरणी सबनीसांनी दोन जणांविरोधात उमरगा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थी संमेलनात बोलत असतांना सबनीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकाच वेळी स्तुती केली आणि टीकाही केली. मोदी पाकिस्तानात गेले.मुळात पाकमध्ये जाणे म्हणजे मरणच…तिथे हाफीज सईद आहे. दाऊद आहे. दहशतवाद्यांचे अड्डे आहे. जर का एखादी गोळी अथवा बॉम्ब पडला असता तर मोदी एका दिवसात संपला असता. पाडगावकरांना श्रद्धाजंली वाहण्याआधीच मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती अशी तिखट शब्दात टीका केली होती.

त्यांच्या या टीकेमुळे एकच वादंग निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सबनीसांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. आज दोन जणांनी सबनीसांना फोनवरुन धमकी दिली. मोदींची माफी मागा नाहीतर हातपाय तोडू अशी धमकी हिरामण गवळी आणि अनुप अग्रवाल या दोघानी जणांनी दिली. अशी धमकी देणं म्हणजे अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर गदा आहे आपण बोलणारच असं प्रत्युत्तर सबनीस यांनी दिली. सबनीस यांच्या तक्रारी वरून उमरगा पोलिसात या दोघांविरोधात 507 कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close