एक्स्प्रेस-वेवर टँकरला आग

February 23, 2010 10:14 AM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारीमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज एका टँकरला आग लागली. खंडाळ्याजवळ ही घटना घडली. त्यामुळे एक्स्प्रेस-वेवरची वाहतूक थांबवण्यात आली होती. तसेच ही वाहतूक जुन्या मार्गाने वळवण्यात आली. टँकर पलटी झाल्यानंतर टायरने पेट घेतल्याने टँकरने पेट घेतला. या टँकरमध्ये स्पिरीट होते. त्यामुळे आग लगेचच भडकली. आयएनएसच्या फायर ब्रिगेडने ही आग आटोक्यात आणली. ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे खंडाळा घाटापर्यंत वाहनांची रांग लागली होती.

close