ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए.बी.वर्धन यांचं निधन

January 2, 2016 9:49 PM0 commentsViews:

ab_vardhan02 जानेवारी : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए.बी.वर्धन यांचं दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर दिल्लीतल्या जी.बी.पंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीतल्या अजॉय भवनमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रेल्वे कामगारांच्या आंदोलनापासून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणारे वर्धन यांनी शेवटपर्यंत कम्युनिस्ट पक्षाचं खंबीर नेतृत्त्व केलं. मुळचे नागपूरचे असलेले ए.बी.वर्धन यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून देशाच्या राजकीय पटलावर स्वतःची एक वेगळी मोहोर उमटवली होती. 1957 साली पहिल्यांदा ते नागपूरमधून महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेले. तर दोनवेळा त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून जाऊन नागपूरचा आवाज संसदेत उठवला होता. वर्धन यांच्या जाण्यानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मोठं नुकसान झालंय अशी भावना पक्षाच्या नेत्यांमध्ये व्यक्त होतेय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close