वीज कर्मचार्‍यांच्या संपात फूट

February 23, 2010 10:21 AM0 commentsViews: 8

23 फेब्रुवारीराज्यातील वीज कर्मचार्‍यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून एका दिवसाचा संप पुकारला आहे. पण या संपात फूट पडली आहे. 90 हजार कर्मचार्‍यांपैकी 20 ते 25 टक्के म्हणजे साधारण 18 ते 20 हजार कर्मचारीच या संपात सहभागी असल्याचे समजते. खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचार्‍यांनी हा संप पुकारला आहे. वीजपुरवठ्यावर परिणाम नाहीपण या संपामुळे वीजपुरवठ्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे महावितरण आणि कर्मचार्‍यांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात वीज कर्मचारी संघटनांसोबत महावितरणच्या मॅनेजमेंटची बैठक झाली. पण त्यात बोलणी फिस्कटल्याने या कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. संपात वीज कामगार कृती समितीच्या 7 कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. पण महावितरणचे इंजीनिअर्स संपात सहभागी होणार नाहीत. दरम्यान मुलुंडमध्ये आंदोलन करणार्‍या वीज कर्मचारी संघटनेच्या 6 कर्मचार्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरीत निदर्शनेरत्नागिरीमध्येही आज वीज मंडळाच्या कर्मचार्‍यांनी खाजगीकरणाच्या विरोधात निदर्शने केली. संपात उतरलेल्या 7 संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सरकारचे खासगीकरणाचं धोरण वीजग्राहकांनाही कसे मारक आहे, यासंबंधी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. मात्र काही अधिकारी आणि कर्मचारी संपात न उतरता कामावर हजर राहिल्याने रत्नागिरीच्या वीज पुरवठ्यावर या संपाचा प्रतिकूल परिणाम झाला नाही

close