बॉम्बच्या धमकीमुळे दिल्ली रेल्वे स्थानकावर ‘हायअलर्ट’

January 3, 2016 1:08 PM0 commentsViews:

GAZIYABAD_CHECKING

02 जानेवारी : मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाला ई-मेलवरुन दिल्ली-कानपूर मार्गावरील ट्रेन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील रेल्वे स्थानकांवर आज सकाळी एकच खळबळ उडाली.

बाँबस्फोटाद्वारे दहशतवादी हल्ला घडवण्याच्या धमकीच्या पाश्‍र्वभूमीवर दिल्ली रेल्वे स्थानकाच्या सुरक्षाव्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने तात्काळ रेल्वे बोर्डाला याची माहिती दिली. त्यानंतर दिल्ली-लखनऊ शताब्दी एक्स्प्रेस गाझियाबाद इथे थांबवण्यात आली. सर्व प्रवाशांना ट्रेनमधून उतरवून ट्रेनची तपासणी करण्यात आली. मात्र ट्रेनमध्ये कुठेही बॉम्ब सापडला नाही. त्यानंतर ट्रेनला मार्गस्थ करण्यात आली.

कानपूरकडे जाणार्‍या कोणत्याही रेल्वे गाड्यांमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी देणारं पत्र मिळाल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. यामुळे अनेक गाड्यांना उशीर झाला असला तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती. वेळेपेक्षा प्रवाशांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, असं रेल्वेनं सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close