सबाउद्दीनच्या वकिलांची मागणी फेटाळली

February 23, 2010 10:33 AM0 commentsViews: 4

23 फेब्रुवारी26/11च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी सबाउद्दीनच्या वकिलांची मागणी स्पेशल कोर्टाने फेटाळली आहे. गुजरातचे डीजीपी, NIA चे प्रमुख, डेव्हिड हेडलीचा ट्रेनर विलास वरक आणि महेश भट यांचा मुलगा राहुल भट या चौघांना साक्षीदार म्हणून कोर्टात हजर करावे, अशी मागणी सबाउद्दीनचे वकील नक्वी यांनी सोमवारी केली होती. त्यावर कोर्टाने आज निर्णय दिला. या स्फोटातील आणखी एक आरोपी फहीम अन्सारी याचा जामीन अर्ज कोर्टाने काल फेटाळला होता. 9 मार्च पासून 26/11 खटल्याचा अंतिम युक्तीवाद सुरू होणार आहे.

close