नक्षलवाद्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला

February 23, 2010 10:41 AM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारीनक्षलवाद्यांच्या 72 दिवसांच्या शस्त्रबंदीच्या प्रस्तावावर सरकारने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. चर्चा करायची असेल तर विनाअट करा, असे सुनावत चर्चेसाठी नक्षलवाद्यांच्या कोणत्याही पूर्वअटींना केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नकार दिला आहे. चर्चा करण्यापूर्वी माओवाद्यांनी हिंसाचार थांबवला पाहिजे, असेही चिदंबरम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. नक्षलवाद्यांनी 25 फेब्रुवारीपासून 72 दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. पण त्यासाठी त्यांच्या काही अटीही आहेत. आपल्याविरोधातल्या सगळ्या कारवाया सरकारने थांबवल्या पाहिजेत, अशी नक्षलवाद्यांची प्रमुख अट आहे.

close