देशातील विविधतेला भेददृष्टीने पाहू नका- मोहन भागवत

January 3, 2016 8:53 PM0 commentsViews:

03 जानेवारी : देशातील विविधतेला भेददृष्टीने पाहू नका, समतेच्या दृष्टीकोनातून पाहा, नुसत्या कायद्याने समरसता येत नाही त्यासाठी मनातून विषमता नाहिशी होणं गरजेचं असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भारत हा शिवरायांना मानणार देश असून शिवाजी महाराजांचं स्मरण होणं, गरजेचं असल्याचेही भागवत यांनी म्हटलं आहे.

¿Ö¦ü¯ÖÖê»Ö ‹Öêê

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाततर्फे पुण्यातील पिपरी-चिंचवड इथे आयोजित केलेल्या शिवशक्ती संगम कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात एकाचवेळी दीड लाख स्वयंसेवकांचे संचलन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज मंत्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तसंच प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आदी उपस्थित होते. राज्यभरातून संघाचे जवळपास दीड लाख स्वयंसेवक मारुंजीत या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते. या शांत आणि शिस्तबद्ध मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले विराट शक्तीप्रदर्शन केलं.

कायद्याने समानता येऊ शकणार नाही असं म्हणत मनातून विषमता जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सत्याची आवश्यकता आहे, सत्य म्हणजेच शिवत्व. शिवत्व हीच आपली प्राचिन परंपरा आहे. शिवत्व हीच एक शक्ती असून शिवत्व आणि शक्तीशिवाय समाता प्राप्त होणार नाही असंही भागवत म्हणालं. आपण सामाजिक भेद विसरून एकत्र आलो नाही तर केवळ संविधान आपल्याला वाचवू शकत नाही असं म्हणत भारताततील विविधतेला भेदाच्या दृष्टीने पाहू नका, तर समतेने पहा असं आवाहनही त्यांनी केलं.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :

- सत्यम शिवम् सुंदरम ही आपली संस्कृती
– सकाळी जमिनीला पाय लावण्यापूवच् मातृभूमीला वंदन करणे ही आमची हिंदू परंपरा आहे
– समता आणणारे कायदे तिथेच यशस्वी झाले जिथे मनातून विषमता गेली.
– शिवत्वा शिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय प्रतिष्ठा नाही
– आपल्याकडे त्याग आणि चारित्र्याला खूप महत्त्व आहे.
– प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ बुद्धीने आपला देश बघायचा असेल तर त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे
– आपल्या शत्रूंच्या छातीवर पाय ठेवून इस्रायल उभा आहे तो शक्तिशाली समजामुळे
– धर्म म्हणजे सगळ्यांना जोडून ठेवतो, त्यांना खाली पडू देत नाही. उलट त्यांची उन्नती करतो.
– जशी जशी आपल्या देशाची शक्ती वाढत जाते तशी तशी देशाच्या सत्याची प्रतिष्ठाही वाढते
– दुर्बल राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींही विचारात घेतल्या जात नाहीत.
– भारतीय संस्कृतिची आज जगात सर्वदूर चर्चा आहे
– स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढली.
– आपलं संगठण हे व्यक्तिनिष्ठ नसून तत्त्वनिष्ठ आहे. आपण तत्त्वांचं अनुसरण करायला हवं.
– शिवाजी महाराजांपुढे अखिल भारतीय प्रदेश होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close