ईशान्य भारतात भूकंपाचे तीव्र धक्के; 6 ठार, 100 जखमी

January 4, 2016 9:04 AM0 commentsViews:

Myanmar border Banner

04 जानेवारी : पूर्व आणि ईशान्य भारताचा परिसर (आज) सोमवारी पहाटे भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

मणिपूरच्या तमेंगलाँग जिल्ह्यात भुपृष्ठापासून 17 किलोमीटर खोलवर या भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदविला गेला आहे. या भूकंपात मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 110 जण जखमी झाले आहेत.

आज पहाटे साडेचारच्या सुमारास मणिपूर, आसाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि त्रिपुरासह ईशान्य आणि पूर्व भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला.तसंच त्यांनी आसामचे मुख्यमंत्री गोगोई यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली आहे.

आसाममधून एनडीआरएफच्या दोन तुकड्या इम्फाळमध्ये पाठवण्यात आल्या असून 12 तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close