सावरगावात शंकरपटाची झिंग

February 23, 2010 11:11 AM0 commentsViews: 3

कल्पना असूरकर्जबाजारीपणा आणि नापिकी विदर्भातील शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पुजली आहे. पण हे दु:ख विसरून शंकरपटात रंगलेले शेतकरी सध्या नागपुरातील ग्रामीण भागात दिसत आहेत. शर्यतीत आपली गाडी पहिली यावी यासाठी शेतकरी आटापीटा करत आहेत. वेगाने धावणार्‍या बैलगाड्यांना प्रोत्साहनही दिले जात आहे. नागपूरजवळच्या सावरगावात हा शंकरपटाची झिंग अनुभवण्यास मिळाली. या शर्यतीसाठी शेतकरी आपल्या बैलांना विशेष खुराक देतात. अनेकजण बैलांना रोज सकाळी दूध, बदामाचा खुराक खाऊ घालतात. सावरगावात गेल्या 60 वर्षांपासून शंकरपाट भरतो. इथे इतर राज्यांतील शेतकरीही सहभागी होण्यासाठी येतात. आणि कर्जबाजारीपणा, नापिकी या सगळ्या टेन्शनमधून काही काळ मुक्त होत विरंगुळा मिळवतात.

close