संपामुळे एसटी कर्मचार्‍यांचा सात दिवसांचा पगार कपात

January 4, 2016 4:26 PM0 commentsViews:

BUs Strike04 जानेवारी : एस.टी. महामंडळातील कर्मचार्‍यांनी पगारवाढीसाठी इंटक संघटनेनं नुकताच संप केला होता. या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचा 1 दिवस संप केला असेल तर सात दिवसांचा पगार कपात होणार असा इशारा दिला गेला होता. नंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यंानी त्याची दखल घेतली. आणि एका दिवसासाठी एकच दिवसाचा पगार कपात केला जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र असं आश्वासन असतानाही कर्मचार्‍यांचा एका पेक्षा जास्त दिवसांचा पगार कपात करण्यात आलाय. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

एस टी कर्मचारी ना नियमानुसार सात दिवस पगार कापण्याची नोटीस दिली आहे. तो किती दिवस कापावा या बाबतीत माझ्याकडे प्रस्ताव येईल. त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close