पठाणकोट चकमक अखेर संपली, 6 दहशतवाद्यांचा खात्मा

January 4, 2016 4:41 PM0 commentsViews:

Pathankot_attack_final04 जानेवारी : पठाणकोट हवाई तळावर गेल्या तीन दिवसांपासून उच्छाद मांडणार्‍या दहशवाद्यांचा अखेर खात्मा करण्यात आलंय. हवाई तळावर सुरू असलेली चकमक अखेर संपली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली आहेत. आता हवाई तळामध्ये सर्व भाग तपासणे आणि ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे.

गेल्या 3 दिवसांपेक्षा जास्त ही चकमक सुरू होती. या सगळ्याला वेळ लागला कारण आतमध्ये अद्ययावत विमानं…इंधनसाठा, आणि इतर यंत्र सामुग्री आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई करतांना फार काळजीपूर्वक पाऊल टाकत हे ऑपरेशन करावं लागलं. पण सुरक्षा यंत्रणांना एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय, की या दहशतवाद्यांना इतकं चांगलं प्रशिक्षण दिलं कुणी…हे कोणत्या तरी देशाच्या लष्कराचंच काम असू शकतं असा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण चकमकीत सहा दहशतवाद्यांचा कंठस्नान घालण्यात आलं. तर भारताचे 3 जवानंना वीरमरण आलंय.

या दहशतवाद्यांनी हल्ला करताना काय रणनीती वापरली ?

- 26/11चा हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांपेक्षाही पठाणकोटचे दहशतवादी जास्त प्रशिक्षित होते
– दारूगोळा 3 दिवस पुरेल अशा पद्धतीनं वापरून त्यांनी हा हल्ला केला
– शनिवारी पहाटे 3 वाजता हा हल्ला सुरू झाला. यावेळी माणसाची सतर्कतेची पातळी सर्वात कमी असते
– खूप वेळ गोळीबार बंद करायचे, त्यामुळे दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असावा अशी शंका येऊ शकते
– या सर्व क्लुप्त्या फक्त लष्करी अधिकारी आणि जवानांनाच माहिती असतात
– म्हणूनच, दहशतवाद्यांना कोणत्या तरी देशाच्या लष्करानंच प्रशिक्षण दिलं होतं, यात शंका नाही

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close