संगमनेर दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, प्रेमीयुगुलाची मित्रांनीच केली हत्या

January 4, 2016 6:08 PM0 commentsViews:

sangmner_muder 
04 जानेवारी : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झालाय. नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील बोटा गावानजिक कस नदीच्या जवळ शेतात जळालेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह 30 डिसेंबर रोजी मिळाले होते या दोघांचा नेमका खून झालाय की आत्महत्या याचा उलगडा घारगाव पोलिसांनी केला असून घरातून पळून जाण्यात मदत करणारे मित्रच या दोघांचे मारेकरी असल्याच समोर आलं आहे.

मयत युवती अल्पवयीन असून शर्वरी अनिल फडके वय 16 ही नाशिकची रहिवासी आहे. तर मयत मुलगा अमन अशोक सिंग वय 19 हा मुंबईचा रहिवासी असून नाशिक येथे एकत्र शिक्षण घेत असतांना दोघांचे प्रेम प्रकरण सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी नाशिक येथून पळून जात निफाड, शिर्डी , पुणे आणि शेवटी चाकण या ठिकाणी मुक्काम केला. या दरम्यान पळून जाण्यात त्यांना पंकज भिकुदास सोनवणे याने मदत केली.

29 डिसेंबर ला पंकज आपल्या दोन मित्रांसह यांना भेटण्यासाठी चाकणला गेला आणि तिथून त्यांना परत घेऊन येत असताना पंकज आणि त्याच्या अन्य दोन मित्रांनी या दोघांचा चाकूचे वार करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांच्या अंगावर पेट्रोल टाकून पळ काढल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, घारगाव पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांनाही जाळण्यात आल्याने ओळख पटवण्याचं अवघड काम पोलिसांना करायचं होतं. दोघांच्या चप्पल आणी मुलीच्या गळ्यातील साखळी एवढ्याचं वस्तू पोलिसांना मिळाल्या होत्या. केवळ सापडलेल्या सोन्याच्या साखळीवरून या घटनेचा तपास लागला आहे. अशोकसिंग याचा मित्र पंकज भिकूदास सोनवणे, विजय राजेंद्र काचे, राहुल राजेंद्र गोतिसे या तिघांनी खून केल्याच उघड केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close